भारतीय राजकारणातील दिग्गज नेते आणि देशातील आर्थिक सुधारणांचे शिल्पकार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी दिल्ली येथे निधन झाले.
दोन वेळा पंतप्रधानपद भूषवलेल्या मनमोहन सिंग यांनी देशाला आर्थिक परिवर्तनाची दिशा दिली आणि आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला. त्यांच्या या योगदानाची देश नेहमीच आठवण ठेवेल.